मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये गर्भधारणेतील सुरुवातीच्या टप्प्यातील गर्भवतीवर 'इआरसीपी' प्रक्रियेद्वारे यशस्वी व सुरक्षित उपचार..
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये गर्भधारणेतील सुरुवातीच्या टप्प्यातील गर्भवतीवर 'इआरसीपी' प्रक्रियेद्वारे यशस्वी व सुरक्षित उपचार..

किरणोत्सर्गाचा वापर न करता उपचार केल्याने गर्भवती महिला आणि बाळ दोघेही सुरक्षित... 
 नवी मुंबई -(पनवेल वैभव) खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे अत्यंत गुंतागुंतीच्या आणि धोकादायक वैद्यकीय परिस्थितीत पहिल्या तिमाहीतील गर्भधारणा यशस्वीपणे वाचविण्यात डॅाक्टरांना यश आले. *डॉ. राव साहेब राठोड( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, यकृततज्ज्ञ आणि उपचारात्मक एंडोस्कोपिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई)* यांच्या नेतृत्वाखालील टिमने १२ आठवड्यांच्या गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार केले. रुग्ण पहिल्या तिमाहीत असल्याने, गर्भाच्या अवयवांच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा काळ होता त्यामुळे  गर्भाचे संरक्षण करण्यासाठी जवळजवळ शून्य किरणोत्सर्गाच्या वापर करून अत्यंत नियंत्रित ERCP (एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कॉलॅन्जियो-पॅनक्रिएटोग्राफी) प्रक्रिया केली.

 *नवी मुंबईत राहणाऱ्या ३९ वर्षीय  श्रीमती करुणा शहा (रुग्णाचे नाव बदलले आहे)*** या महिलेला आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे पहिल्यांदाच गर्भधारणा झाली होती. तिला तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप, अशक्तपणा आणि डोळे पिवळे पडण्याची लक्षणं जाणवू लागली. सुरुवातीला हा गर्भधारणेशी संबंधित किरकोळ त्रास असावा असे वाटत होते, मात्र हळूहळू लक्षणं वाढत गेल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 *डॉ. राव साहेब राठोड( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपेटोलॉजिस्ट आणि थेरप्यूटिक एंडोस्कोपिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) म्हणाले,*  २ जानेवारी रोजी रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ओटीपोटात वेदना, ताप आणि कावीळची समस्या आढळून आली, जो वेगाने वाढून जीवघेणी ठरु शकते. या प्रकरणात १२ आठवड्यांच्या आयव्हीएफ गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या संरक्षणास प्राधान्य देत उपचार करण्याचे ठरले. रक्त चाचण्यांमध्ये पांढऱ्या रक्त पेशींची संख्या (२१०००/मायक्रोलिटर) दिसून आली जी सक्रिय संसर्ग दर्शवते, तसेच यकृत कार्य चाचण्यांमध्ये संसर्ग आढळून आला. अल्ट्रासाऊंड तपासणीत पित्ताशयाचे छोटे छोटे खडे आणि एक मोठा खडा सामान्य पित्त नलिकेत अडकल्याचे आढळून आले, ज्यामुळे कावीळची लक्षणं दिसून आली होती. पित्त नलिकेतील खड्यांची समस्या १२०० पैकी १ गर्भधारणेत दिसून येतो आणि यापैकी सुमारे ५-१०% रुग्णांमध्ये संसर्ग दिसून येतो.ही स्थिती जीवघेणी ठरू शकते आणि त्यामुळे तात्काळ उपचार आवश्यक होते.

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत गर्भाच्या अवयवांचा विकास सुरू असतो. या काळात एक्स-रे किरणांचा धोका संभवतो. त्यामुळे डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक ERCP (एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कॉलॅन्जियो-पॅनक्रिएटोग्राफी) ही प्रक्रिया जवळजवळ शून्य किरणोत्सर्गात केली.या प्रक्रियेद्वारे पित्तनलिकेत अडकलेले एकूण सहा खडे काढण्यात आले आणि पित्त नलिकेतील अडथळा दूर करण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया सुमारे १५ मिनिटांत पूर्ण झाली. यामुळे यकृत निकामी होणे, सेप्सिस किंवा स्वादुपिंडाचा दाह यांसारख्या गंभीर गुंतागुंती टाळता आल्या.

प्रक्रियेनंतर ४८ तासांत रुग्णाची प्रकृती स्थिर झाली आणि तिसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सात दिवसांनंतरच्या फॅालो अप तपासणीत रक्त व यकृताच्या चाचण्या पूर्णपणे सामान्य आढळल्या. रुग्णाला पुढील काळात चरबीयुक्त आहार टाळण्याचा आणि ताप, पोटदुखी किंवा कावीळ आढळल्यास तात्काळ रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला.

जेव्हा मला सांगण्यात आले की मला गंभीर संसर्ग झाला आहे, तेव्हा मी खूप घाबरली. मी गर्भवती होती आणि मला माझे बाळ सुरक्षित असणे अतिशय महत्त्वाचे होते. आम्हाला डॉक्टरांनी ही प्रक्रिया समजावून सांगितली आणि माझ्या बाळाच्या संरक्षणासाठी विशेष खबदारी घेतली जाईल याचे आश्वासन दिले. मी डॉ. राव साहेब आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की प्रसंगावधान राखत काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळले *अशी प्रतिक्रिया रुग्ण श्रीमती करुणा शहायांनी व्यक्त केली.* 

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य आणि विविध विभागांमधील समन्वय यामुळे गर्भधारणेसारख्या नाजूक अवस्थेतही गंभीर आजारांवर सुरक्षित आणि यशस्वी उपचार शक्य आहेत याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. उच्च-जोखीम आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रसंगावधान राखत, तंत्रज्ञानाचा अचूक वापर केल्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरल्याची *प्रतिक्रिया संदीप जोशी(केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी व्यक्त केली.*
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image