भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा उत्सव ...
पनवेल (प्रतिनिधी) देशाचा स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहामध्ये साजरा झाला. यामध्ये आणखी भर टाकली ती खारघरमध्ये झालेल्या 'भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रेने. विशेष म्हणजे हि रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा ठरली. ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या देशभक्तीच्या उत्सवात हजारो नागरिक, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत' वर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत आहे. आणि हे होत असताना देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात व अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण कायम केले जाते. त्या अनुषंगाने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. हि भावना कायम वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात आली. प्रत्येक भारतीयांसाठी १५ ऑगस्ट हा खूप खास आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाचे प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी केवळ आपला देशच स्वतंत्र झाला नाही तर या दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्याला आपले मूलभूत अधिकार मिळाले. हा दिवस देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करतो आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकराष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देतो. हा केवळ राष्ट्रीय सण नसून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या तन, मन आणि धनाने बलिदान दिले, त्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आजच्या तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा उत्सव अधोरेखित होत होता. यावेळी भारत मातेचा जयजयकार आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता.
खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या तिरंगा पदयात्रेला प्रारंभ झाला. ते पुढे मार्गक्रमण करत समारोप उत्सव चौकात झाले. या पदयात्रेत लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजेश्री वावेकर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, मनोहर म्हात्रे, अमर पाटील, शत्रुघ्न काकडे, तेजस कांडपिळे, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, संजना कदम, नेत्रा पाटील, अनिता पाटील, नीता माळी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अमित ओझे, समीर कदम, ऍड. आशा भगत, अमर उपाध्याय, भाऊ भगत, प्रदीप भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, मयुरेश खिस्मतराव, अभिषेक भोपी, प्रवीण बेरा, बिना गोगरी, गीता चौधरी, सपना पाटील, साधना पवार, सुहासिनी केकाणे, संध्या शारबिद्रे, विपुल चौटालिया, ऍड. राजेंद्र अग्रवाल, संतोष शर्मा, यांच्यासह सायकलपटू, हजारो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्याचा सहभाग होता. एकूणच अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या या तिरंगा रॅलीने संपूर्ण रायगड आणि नवी मुंबईचे लक्ष वेधून घेतले.