महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
नवी मुंबई /वार्ताहर : -
बुधवार दि २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व गणेश पूजन, दीप प्रज्वलन मान्यवरच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच दिवंगत बिल्डर कै संग्राम पाटील व कै दिलीप वढावकर यांना श्रद्धांजली देण्यात आली
यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना बाळासाहेब देशमुख व तुकाराम दुधे यांनी केली यात त्यांनी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पुढील ध्येय- धोरणे सांगितली.
या वेळी महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई कमिटी मा.अध्यक्ष सुरेश हावरे याचे आभार मानत नवनिर्वाचित कमिटी चे उपाध्यक्ष के के म्हात्रे, विकास भामरे, लक्ष्मण साळुंखे, महेश माटे. कार्याध्यक्ष- हितेश सावंत, सहसचिव- रवींद्र जोशी आणि अजित यालमार, सहखजिनदार- उत्तम यलमार आणि संजय इंगळे, कमिटी सदस्य- किरण बागड, बाबासाहेब भोसले, अजय पाटील, रामचंद्र मोरजकर, सुनील ठोंबरे, संतोष आंबवणे, आशिष काकडे. मीडिया प्रमुख - राजेंद्र कोलकर, निमंत्रक-संदीप सावंत, मा अध्यक्ष प्रकाश बाविसकर तसेच नवीन सदस्य पत्रकार यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमा चे प्रायोजकत्व Idbi bank आणि rera vision यांचे होते त्यांचे स्वागत करून मान्यवरांनी आपली मते मांडत शुभेच्छा दिल्या. यावेळी idbi आणि rera vision यांनी आप आपली माहिती दिली मोठया उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.