भावना होंडा यांच्याकडून हेल्मेट वाटप करून जनजागृती..
भावना होंडा यांच्याकडून हेल्मेट वाटप करून जनजागृती
पनवेल : - वाहतुकीच्या नियमाचे व जीवनाचे महत्व समजून घेत असताना आपण बऱ्याचदा घाईमुळे किंवा आळसापोटी नियमांचे उल्लंघन करतो. जे आपल्या जीवावर पण बेतते. मात्र प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे. विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना भावना होंडा, ईट प्ले रीड संस्थेच्या माध्यमातून हेल्मेट वाटप करण्यात आले. 
       ईट प्ले रीड संस्थेच्या संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ भावना ग्रूपच्या अपर्णा शहा यांनी नवी मुंबई नेरूळ येथे  चांगल्या सवयीमध्ये परिवर्तन करण्यासाठी" ईट प्ले रीडच्या माध्यमातून संदेश दिला. केवळ सल्ला देणारे आपणास अनेक दिसतात, भेटतात पण त्यांनी केवळ सल्ला न देता दुचाकी वाहन धारकांना मोफत हेल्मेट वाटप केले. 
यावेळी त्या स्वतः उपस्थितीत राहून पोलिस अधिकारी आणि सर्व वाहतूक नियंत्रक पोलीस यांच्या सोबत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी श्रीकांत धरणे वरीष्ठ पोलिस उपनिरीक्षक तुर्भे वाहतूक शाखा, दयानंद महाडेश्वर पोलिस उपनिरीक्षक तुर्भे वाहतूक शाखा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी हेल्मेट मोफत आहे, जीव मोफत नाही जीवाची आणि परिवाराची काळजी घ्या असा सल्ला देण्यात आला. ईट प्ले रीडच्या माध्यमातून ही टीम एक चांगला अभियान राबवत आहे. समाजाच्या सवयीना चांगल्या सवयीमध्ये परिवर्तन करण्यात कार्यरत आहेत.
Comments