पनवेल शहर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचार्‍यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती..
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे तीन कर्मचार्‍यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती..
पनवेल वैभव, दि.15 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणार्‍या तीन कर्मचार्‍यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अंबादास कांबळे, संजय धायेराव व संतोष म्हात्रे यांना बढती मिळून ते पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे व त्यातील अंबादास दानवे यांची तुर्भे पोलीस ठाणे, संजय धायेराव यांची सानपाडा पोलीस ठाणे तर संतोष म्हात्रे यांची सीबीडी पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.प्रवीण भगत, बाळकृष्ण सावंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



फोटो ः विवेक पानसरे इतर अधिकारी शुभेच्छा देताना.
Comments