रिक्षासह पिकअपमध्ये जनावरांच्या मासांची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
रिक्षासह पिकअपमध्ये जनावरांच्या मासांची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई 
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः रिक्षासह पिकअप मध्ये जनावरांच्या मांसाची अनधिकृतपणे वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस तसेच खारघर पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे. 
पनवेल जवळील पारगाव येथे एका रिक्षामध्ये जनावरांचे मांसाची अनधिकृतपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर गाडीला अडवून गाडीसह चालकाला ताब्यात घेतले आहे. व त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्‍या घटनेत महिंद्रा कंपनीच्या पांढर्‍या रंगाची पिकप एम एच 46 सीएल 0934 मधून अनधिकृतपणे जनावरांचे मांस मुंबईच्या दिशेने वाहतूक होणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते खारघर टोल नाका येथे थांबले. यावेळी या गाडीला हात दाखवून तिला बाजूला घेतली. वाहन चालकाने त्याचे नाव प्रशांत महादेव दुधाळे (वय 29 , राहणार सोलापूर) असे सांगितले. या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.


फोटो ः पकडलेली रिक्षा
Comments