१३ ते १५ ऑगस्ट 'घरोघरी तिरंगा' मोहिम
पनवेल/प्रतिनिधी -- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यासह वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'घरोघरी तिरंगा' फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वडघर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी केले आहे.
राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'घरोघरी तिरंगा' फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे.
मोहन दिवकर - ग्रामविकास अधिकारी, वडघर ग्रामपंचायत