स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संपन्न...
वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संपन्न...

पनवेल वैभव, दि.९ (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम संपन्न केले. यामध्ये त्यांनी वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मानसन्मान, त्याचप्रमाणे महिला कार्यकर्त्यांना मोफत साडया वाटपाचा कार्यक्रम केला. 
वडघर पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बुद्ध विहार येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरीता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे युवा नेते अनिकेत संसारे ,अशोक वाघमारे ,विजय पवार ,अमित हिरवे ,सिद्धार्थ पेडणेकर, विजय धोत्रे ,चंद्रकांत कांबळे, महेंद्र मोरे, काशिनाथ कांबळे, अरुण धीवर, भगवान गरुड, सुदाम पाटील ,अनिल नाईक, राजेश खुटले, राजू करपे, एम एस ई बी अभियंता देविदास बैकर , वाहतूक शाखेचे सुरज पाटील ,माजी नायब तहसीलदार संजोग माने व इत्यादी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.  

त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील अनेक स्वाभिमानी युवक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते , सामाजिक धार्मिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



फोटो ः महेश साळुंखे
Comments