१३ लाख ५० हजार रुपये किमतीचे ८२ चोरी-गहाळ झालेले मोबाईल परत ; खारघर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक..
 खारघर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक...

 
पनवेल :- १३ लाख ५० रुपयांचे ८२ चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत संबंधित मोबाईल परत करण्यात आले. आणखी ८०० मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीचे वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.
      २०२३ ते २०२४ दरम्यान खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी, तर काहींचे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी मोबाईल चोरीसह हरविल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे उप निरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे , फिरोज आगा, वाजिद शेख, सचिन डावरे, मोरे असे अन्य पोलीस पथकाने मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गहाळ झालेले १३ लाख ५० हजार रुपयांचे ८२ मोबाईल हस्तगत केले होते. संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलवून परत करण्यात आले. यावेळी या मालकांनी खारघर पोलिसांचे आभार व्यक्त केले.  इतर ८०० मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच ते मोबाईल हस्तगत करुन त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी यावेळी सांगितले.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image