महापालिकेच्यावतीने अदखल पात्र गुन्हा दाखल..
पनवेल, दि.18 : आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार महापालिका कार्यक्षेत्रातील तोंडरे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीवरील वृक्षतोड करणाऱ्या अज्ञात इसमांविरोधात महापालिकेच्यावतीने तळोजा पोलिस स्थानकामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील तोंडरे गावातील एका शेतकऱ्याच्या जमिनीवरील आंबा,केळी, शेवगा अशी 12 झाडे अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी तोडली होती. याबाबतची तक्रार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानूसार या गुन्ह्यातील अज्ञात इसमांविरोधात तळोजा पोलिस स्थानकांमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल महापालिका हद्दीतील झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. संबधित ठिकाणी तोडलेल्या झाडांपैकी काही झाडे ही भाजी वर्गीय असून त्याविरोधात तक्रार करता येत नाही, त्यामुळे तीन आंब्यांच्या झाडांच्या फाद्यांची छाटणी करून झाडास इजा व नुकसान पोहचविल्याबद्दल अज्ञांताविरोधात तळोजा पोलिस स्थानकांमध्ये अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फोटो : संग्रहित