उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार..
उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार..


पनवेल - पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उद्योजक हरभजनसिंग संधेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत.नुकत्याच लंडनमध्ये ( ब्रिटन) संसदीय निवडणुका झाल्या,त्यात उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफबरो येथून निवडून आला आहे.तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला.पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जीवन संधेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसायानिमित्त पनवेल औद्योगिक वसाहत आणि लंडन असं उद्योगाच एक नातं तयार झाले आहे.जीवन संधेर हा तरुण असून अगदी कमी वयात निवडून आला आहे,यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता.तो खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image