शासनाच्या ऑनलाईन सेवेच्या उडालेल्या बोजवारावर पनवेल तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेची धडक
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः सर्वसामान्य नागरिकांना तहसीलदार कार्यालयात होणारा त्रास, शासनाच्या ऑनलाईन सेवेचा उडालेला बोजवारा, रेशनधान्य दुकानदारांची बिघडलेली ऑनलाईन सेवा आधारलिंकसाठी सर्वसामान्य नागरिकांची होणारी परवड त्यामुळे रेशनधान्य पासून वंचित, प्रतिज्ञापत्र, दाखले वाटप रेशनकार्ड वाटप याबद्दल होणारी दिरंगाई यासर्व बाबींचा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांनी आज पनवेल तहसीलदार विजय पाटील यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्याचा पाढाच वाचून दाखविला व शिवसेना पनवेल तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्यासोबत युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, शहरप्रमुख प्रविण जाधव, विभागप्रमुख प्रमोद पाटील, जीवन पाटील (युवासेना चिटणीस पनवेल ), जयंत पाखरे (उपविभागप्रमुख ), नंदू म्हात्रे (उपशाखाप्रमुख ), निलेश खारके (उपविभाग प्रमुख ), नितीन पाटील (उपविभाग प्रमुख ) उपस्थित होते.
फोटो ः शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन