प्रभुदास भोईर यांच्या नूतन कार्यालयाचे मा आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..
मा आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
   
पनवेल / प्रतिनिधी.
           शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या आलिशान नूतन कार्यालयाचे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या अमृतयोगावर उद्घाटन संपन्न झाले.यावेळी बाळाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रभुदास भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
            प्रभुदास भोईर यांचे कार्यालय म्हणजे वाहतूकदार, माथाडी कामगार, असंघटित कामगार आणि गोरगरिबांचे हक्काचे कार्यालय असते. दिवसेंदिवस प्रभुदास भोईर यांच्या कार्याची व्याप्ती वाढते आहे. राज्यभरातील माथाडी कामगार आणि वाहतूकदार त्यांच्या समस्या घेऊन प्रभुदास भोईर यांच्या कार्यालयात येत असतात. आपल्या कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे गरजवंत उभा राहिलेला प्रभुदास भोईर यांना बघवत नव्हता. येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये या उदात्त भावनेतून त्यांनी आलिशान प्रशस्त नूतन कार्यालय उभारले आहे. अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आणि श्री. दत्त महाराजांचे निस्सिम भक्त असणाऱ्या प्रभुदास भोईर यांनी मुद्दाम गुरुपौर्णिमेचा अमृतयोग दिवस कार्यालयाच्या उद्घाटनासाठी निवडला.
         पहाटेच्या सत्रात श्री. दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर प्रभुदास भोईर यांनी पत्नी अंजली प्रभुदास भोईर यांच्या समवेत होम हवन, गणेश पूजन, ग्रहशांती,उंबरठा पूजन असे धार्मिक विधी केले.त्यानंतर महाआरती संपन्न झाली व उपस्थितांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
          नूतन कार्यालय उद्घाटन सोहळ्याला मा आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत माजी नगरसेवक रवींद्र भगत, सरस्वती ताई काथारा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर, माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख बाळासाहेब बोरकर, सुभाष गायकवाड,गणेश भोईर, दीपक गोंधळी,भूषण म्हात्रे, जाकीर खान,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments