दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
"सायबर सेल"पनवेल यांनी केले जेरबंद ...


पनवेल, दि.२४(संजय कदम) दुबई येथुन कॉल व व्हॉटसअप करून फिर्यादीला फोरेक्स ट्रेडींग मध्ये गुंतवणुक करून चांगला परतावा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादीस त्यांचे डेबिट, केडिट कार्डमधुन टप्याटप्याने एकुण रू. १८,५४,२५५/- वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करावयास सांगुन व रू. ४ लाख रोख घेवुन एकुण रू. २२,५४,२५५/- ची फसवणुक केली म्हणुन खांदेश्वर पोलीस ठाणे येथे १३०/२०२४ भा.दं.वि. कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६, (सी) (डी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सायबर सेल, पनवेलच्या पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व पथकाने सदर गुन्हयातील बँक व्यवहार विश्लेषण आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्हयातील संशयित आरोपी टोळी हि दुबई येथुन फॉरेक्स ट्रेडिंग फॉड करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तरी सदर आरोपी बाबत अधिक तपास करता सदर गुन्हयातील एक आरोपी अॅन्टॉप हिल मुंबई याठिकाणी आला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली असता सदर आरोपीस सापळा रचुन शिताफिने अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे गुन्हयातील नमुद कंपनी, वेबसाईट व इतर आरोपी इ. बाबत अधिक माहिती व पुरावे मिळुन आले असुन सायबर सेल, पनवेल त्याअनुषंगाने पुढील तपास करीत आहेत.
     फिर्यादीच्या फसवणुक झालेल्या एकुण २२,५४,२५५/- पैकी एकुण रू. ९,७५,४५५/- रक्कम फिर्यादीस बँकांकडुन परत करण्यात येत आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ पनवेल विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग  अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली EMC सायबर सेलचे पोनि दिपाली पाटील, सपोनि वृषाली पवार, पोउपनि किरण राउत, पो.हवालदार वैभव शिंदे, प्रगती म्हात्रे, पो.शि. संतोष चौधरी या पथकाने उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास EMC सायबर सेल, पनवेल पोलीस निरिक्षक दिपाली पाटील करीत आहेत.
      नवी मुंबई आयुक्तालयामार्फत जनतेला आवाहन करण्यात येते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. २४/०४/२०२४ रोजी एकुण ७५ फॉरेक्स डिलर्स अनधिकृत घोषित केलेले असुन आरबीआयने फॉरेक्स ट्रेडींगबाबत वेळोवेळी नियम, सुचनाही जारी केलेल्या आहेत. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यापुर्वी सदरबाबत माहिती घेवुन सतर्क राहुन गुंतवणुक करावी. ऑनलाईन फसवणुकीची तकार टोल फ्री क. १९३० किंवा cybercrime.gov.in येथे त्वरीत करावी.
Comments