खारघर वाहतूक शाखेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे..
खारघर वाहतूक शाखेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे ..


पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी यादृष्टीने खारघर वाहतूक शाखा हद्दीतील गोखले स्कूल सेक्टर 12 या शाळेत खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एस काणे यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
ट्रॅफिक अवेअरनेस कार्यक्रम घेऊन आरएसपी व इतर अशा  86 विद्यार्थी व 78 विद्यार्थिनी अशा एकूण 164 विद्यार्थ्यांना आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एस काणे खारघर वाहतूक शाखा यांनी स्टाफ सह वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळणे बाबत आवाहन केले.यावेळी काणे यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्‍नोत्तराद्वारे संवाद साधला. वाहतूक नियमांविषयी प्रश्‍न विचारले. विद्यार्थ्यांनी काही प्रश्‍नांची उत्तरे बरोबर, तर काही चुकीची दिली. चुकीच्या उत्तराबाबत काणे यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावरुन चालताना कोणत्या बाजूने चालावे, वाहन कोणत्या बाजूने चालवने याबाबत सविस्तर माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.



फोटो ः रस्ता सुरक्षेचे धडे
Comments