जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान 

पनवेल / प्रतिनिधी  - :        
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल सामाजिक, शैक्षणीक, वैद्यकिय असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असतो.

जम्मू काश्मीर आणि आफ्रिका खंडातील मोझांबिक या ठिकाणी मेडिकल सर्जिकल कॅम्प घेऊन रोटरीने महत्त्वाचे योगदान केले.
 सदर मेडीकेल कॅम्प मध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या रोटेरियन डॉक्टरांचा सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक ७ जून रोजी पनवेल मधील सुरुची सभाग्रुहात " तेथे कर माझे जुळती " या कार्यक्रमात पार पडला.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे प्रेसिडेंट रतन खारोल आणि सेक्रेटरी अनिल खांडेकर यांच्या विंनती ला मान देऊन, सदर कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके या प्रमुख पाहुण्या तर DGND रो. नितीन धमाले आणि PDG रो. डॉक्टर गिरीश गुणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

या कार्यक्रमात सुरुवातीलाच रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ची गेल्या 34 वर्षांतील दैदिप्यमान वाटचाल क्लबच्या आत्ममनोगता च्या माध्यमातून रो. अनिल ठकेकर यांनी मांडला.

 रोटरी डिस्ट्रिक्ट 3131, 3132, 3060, 3070 आणि जम्मू काश्मीर सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण काश्मीर मध्ये ३ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर.२०२३ या दरम्यान मेगा सर्जिकल प्रोजेक्ट राबविला गेला. तसेच आफ्रिका खंडातील मोझांबिक या देशामध्ये.१४ एप्रिल ते २७ एप्रिल २०२४ या दरम्यान मेडीकल सर्जिकल कॅम्प राबविला गेला.
पनवेल मधील सुप्रसिद्ध सर्जन, PDG डॉ. गिरीश गुणे यांनी पॉवर पॉइंट प्रेसेंटशन करून मेडिकल सर्जिकल कॅम्पमध्ये आलेले  चित्तथरारक अनुभव आणि माहिती सांगितली.

जम्मू काश्मीर आणि आफ्रिका खंडातील मोझांबिक देशामध्ये मेगा सर्जिकल कॅम्प मध्ये महत्वाचे योगदान देणारे रो.  डॉ. गिरीश गुणे, रो. डॉ. सुभाष सिंग, रो. डॉ. लेखा उचील, रो. डॉ. राजेश पवार, रो. डॉ. शामराव कुलकर्णी, रो. डॉ. विष्णू नांदेडकर, रो. डॉ. दत्तात्रेय भुसारे, रो. डॉ. सागर गुंडेवार, रो. डॉ. मनोज भायगुडे, रो. डॉ. आनंदराव खडके या रोटेरियन डॉक्टरांचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके या प्रमुख पाहुण्या तर DGND रो. नितीन धमाले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानाची शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

 सदर कार्यक्रमा प्रसंगी रोटेरियन, एन्स, अनेट्स, इतर क्लबमधील रोटरी  पदाधिकारी यांनी सभागृह भरून गेला होता. सदर कार्यक्रम रो. डॉ. अमोद दिवेकर आणि PDG रो. डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके आणि DGND रो. नितीन धमाले यांनी मेडिकल सर्जिकल प्रोजेक्ट बाबत आपले मार्गदर्शनपर विचार मांडून सर्व सर्जिकल कॅम्पवीरांच कौतुक केले.
Comments