कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण समाजातर्फे आयोजित रक्तदान शिबीरास उदंड प्रतिसाद ...
           १६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान...
पनवेल वैभव, दि.3 (वार्ताहर) ः रक्तदान शिबीर ऑरायन मॉल पनवेल येथे भरवण्यात आले होते पनवेल परीसरातील नागरीकांनी दिलेल्या भरपुर प्रतिसादा मुळे 166 बाटल्यांचे रक्त संकलन झाले आहे. पनवेलकरांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल मंडळाचे अध्यक्ष व ओरायन मॉल चे मालक मंगेश परुळेकर यांनी पनवेलकरांना धंन्यवाद दिले आहेत.
उन्हाळ्या च्या दिवसात रक्तदानास कमी प्रतिसाद मिळतो तरीही या रक्तदाना शिबीरास भरपुर प्रतिसाद देऊन जास्तीजास्त रक्त संकलनाचे उदिष्ट पार पडले आहे असे त्यांनी म्हटले आहे. रक्तदाना शिबीरास आमदार प्रशांत ठाकुर यांनी भेट दिली व सांगीतले की सध्या रक्ता चा तुटवडा जाणवत आहे व आत्ता तुम्ही रक्तदाना शिबीर धेणे हे खरेच कौतुकास्पद आहे. या शिबीरास प्रितम म्हात्रे यांनी भेट देउन स्वता रक्तदाना केले या मुळे मंडळाच्या कार्यकरत्याचा उत्साह वाढला. त्यांनी सांगीतले की आत्ता सुट्टी मुळे , उन्हाळ्या मुळे नी निवडणुक आचार सहिते मुळे कुठेच रक्तदाना शिबीरे नाहीत त्या मुळे रक्ता चा तुटवडा जाणवत आहे अशात तुम्ही शिबीर भरऊन खरेच समाजऊपयोगी कार्य करत आहात. पनवेल मधील प्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे याची यांची भेट सर्वात महत्वपूर्ण होती ज्यानी रक्तदाना च महत्व नी त्याचा तुतवडा या धर्ती वर तुमच रक्तदान शिबीर अतिशय महत्वपूर्ण आहे अस सांगीतले. या रक्तदाना शिबीरास पनवेल चे प्रसिद्ध बाधकाम व्यावसायिक विलास कोठारी यांनी ही भेट दिली व मंडळाच्या कार्यकरत्यांचे अभिनंदन केले मंडळाच्या उपाध्यक्ष नंदा नाईक यांनी ओरायन मॉल मधील जागा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या बद्दल व सहकार्या बद्दल मॉल प्रशासनाचे आभार मानले या प्रसगी मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार मानले. कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण समाज पनवेल यांचे अध्यक्ष मंगेश परुळेकर, उपाध्यक्ष नंदा नाईक, सचिव यतीन ठाकुर, खजिनदार विनायक तिरोडकर, सभासद शाम वालावलकर, हरीश परुळेकर, चंद्रकांत तेंदुलकर, भाऊ सामंत, अपूर्वा प्रभू, भारती खानोलकर, क्रांति ठाकुर, नीशा वालावलकर राजश्री देसाई, चेतना वालावलकर, सुनेत्रा गव्हाणकर चिन्मय नाईक, गौरांग नाईक, सृष्टि नाईक यांनी अथक परीश्रम करुन रक्तदान शिबीर यशस्वी पणे पार पाडले.



फोटो ः रक्तदान शिबीर
Comments