वर्षा सहलीसाठी गेलेल्या ९ तरुणाईंचा वाचविला खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी जीव...
पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी जीव...

पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी वाचविला आहे.
मुंबई परिसरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी त्यामध्ये 8 मुली व 1 मुलगा साधारण 18 ते 20 वयोगटातील हे आज सकाळी तालुक्यातील पनवेल-माथेरान रस्त्यावरील आदई गावाजवळ असलेल्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आनंद लुटण्यासाठी गेले असताना तेथून खाली उतरताना या विद्यार्थ्यांना मार्ग निसटता असल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले होते. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या तरुणाईंचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ अग्नीशमन दल व खांदेश्‍वर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने त्यांची पथके सदर ठिकाणी येवून त्यांनी या 9 जणांना रेस्न्यु करून डोंगरावरुन सुखरुप खाली उतरविले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. यामध्ये साक्षी चेतन दर्जी, युक्ती धर्मेंद्र पटेल,  हेमंत केतन शर्मा, लय प्रशांत गोपर (सर्व रा. भाईंदर) अशी चौघांची नावे आहेत. याच दरम्यान कोन इंडियाबुल्स येथील देखील काही तरुण-तरुणी डोंगर परिसरात गेले होते. त्यांना देखील खाली आणण्यात आले. यावेळी खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश ओंबासे यांच्यासह अग्निशामक दलाचे प्रशांत कुंडलिक दरेकर, अग्निशमन प्रणेता, वैभव खंडागळे अग्निशमन प्रणेता, नवनाथ आंधळे  यंत्र चालक, संतोष पड्याळ अग्निशामक, भूषण पाटील अग्निशामक, योगेश शिंदे अग्निशामक, दिग्विजय धुमाळ अग्निशामक उपस्थित होते. वर्षा सहलीसाठी येताना तरुणांनी त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून यावे. तसेच या संदर्भातील माहिती आपल्या कुटुंबियांना तसेच महाविद्यालयाला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

फोटो ः रेस्क्यू करून वाचविलेले तरुण
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image