कोकण पदवीधर मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा...
पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा...

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 च्या आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेल येथे संपन्न झाला. यावेळी महाआघाडीचे उमेदवार रमेश किर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याचा निर्धारच उपस्थितांनी केला.
यावेळी निर्धार मेळाव्याला पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा.आ.मनोहरशेठ भोईर, मा.आ.बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, ज्येष्ठ नेते आर.सी.घरत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, आरपीआयचे नरेंद्र गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, युवा सेनेचे पराग मोहिते, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, काँग्रेसचे हेमराज म्हात्रे, नंदराज मुंगाजी, शेकापचे काशिनाथ पाटील, मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, कामगार नेते वैभव पाटील, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, सदानंद शिर्के, श्रृती म्हात्रे, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ.भक्तीकुमार दवे, मा.नगरसेवक अरविंद सावळेकर आदींसह पनवेल विधानसभा मधील सर्व वरीष्ठ पदाधिकारी तसेच मतदार या बैठकीला उपस्थित होते. 
यावेळी बोलताना पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील  यांनी सांगितले की, मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून फक्त 9 दिवस मेहनत घेतली तर विजय आपला निश्‍चित असून येथे कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नसून आपण सर्व समान आहोत. या भावनेतून काम करूया व महाविकास आघाडीचा उमेदवाराला विजयी करू या, असे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी मा.आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, विजयासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लेाकसभेला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे व उमेदवाराला भरघोस मतदान सुद्धा झाले आहे. ही निवडणूक सुद्धा अशाच पद्धतीने एकदिलाने लढवायची आहे व विजयासाठी लढायचे आहे या उद्देशानेच जीवाचे रान करू या, असे आवाहन त्यांनी केले. मा.आ.मनोहरशेठ  भोईर यांनी सांगितले की, उरणमध्ये सुद्धा पदवीधर मतदार संघाची नोंदणी शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उरणमधून आघाडीवर होता. यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. प्रामुख्याने लोकसभेला उरण मतदार संघातील अनेक भागातील मुस्लीम व ख्रिश्‍चन बांधवांनी आपल्याला भरभरुन मतदान केले होते. यावेळी सुद्धा ते निश्‍चितच मतदान करतील व आपल्या उमेदवाराला विजयी करतील, असे सांगितले. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सुद्धा पनवेल-उरणमधून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रमेश किर यांना आघाडी द्यायची आहे. त्यासाठी आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी आम्हा तरुणांना मार्गदर्शन करावे व योग्य नियोजन करून प्रत्येकाला कामाची वाटणी करून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.


फोटो ः महाविकास आघाडी मेळावा
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image