ग्रँड उरण सेंट्रल' प्रोजेक्ट बदलणार उरण शहराचा चेहरा मोहरा..
विकासक रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांचे स्वप्नातील 'ग्रँड उरण सेंट्रल' प्रत्यक्षात येणार

उरण : - 
उरणचा चेहरामोहरा बदलवून टाकणारा 'ग्रँड उरण सेंट्रल' हा प्रोजेक्ट उरणमध्ये उभा राहत आहे. या रेरा अप्रोव्हड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफ स्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला 'ग्रँड उरण सेंट्रल' विविध सोयीसुविधांनी उपयुक्त असा आहे. 'अल्टो फिन' ही नवी मुंबईतील विकासकांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शिअल प्रोजेक्ट उभारतेय. 

उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेले हे सर्वांग सुंदर असे स्वप्नातील 'ग्रँड उरण सेंट्रल' आता प्रत्यक्षात उभे राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरचं काही... हा प्रोजेक्ट फक्त कमर्शिअल नसून रेसिडेंसिअल सुद्धा असणार आहे. 

दिनांक २४ मे रोजी उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्ट लाँच सोहळा संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून 'ग्रँड उरण सेंट्रल' प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला चारचाँद लावले. 

'ग्रँड उरण सेंट्रल'मध्ये अवघ्या ५,६०० रुपये per square feet प्रमाणे तब्बल १४०० square feet चे घर तुम्हाला अवघ्या ८९ लाखांमध्ये मिळून जाते. त्याच प्रमाणे शॉप आणि ऑफिसच्या किमती देखील अत्यंत किफायतशीर अशाच आहेत. अवघ्या ८,५०० रुपये per square feet सह ५% GST देऊन तब्बल २८० square feet चे शॉप २५.२५ लाखांत मिळते तर अवघे ९००० रुपये per square feet किंमतीसह ५% GST भरून तब्बल ३०० square feet चे शॉप गुंतवणूकदाराच्या हक्काचे बनते.  

दरम्यान, थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लाँच सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, ठाकरे गट सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर आदी उपस्थित होते.
Comments