महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना सकल मराठा समाजाचा पाठिंबा
पनवेल / वार्ताहर :
महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अश्वासन दिले पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे. मराठा समाजाच्या मनात खदखद आहे, तो रोष काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाने करीत मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिबा जाहिर खोपोलीतील बैठकीत 4 मे रोजी दिला आहे.
तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याची भुमिका राजकारण व समाजकारण करताना नेहमीच घेतली आहे. मात्र, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भुमिका घेण्यासाठी मी बांधील आहे. मराठा आरक्षणाबाबत संसदेत भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करू तसेच मराठा समाजासोबत सर्वच समाज घटकांना न्याय देवू, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील असे अश्वासन देत मराठा समाजाने दिलेल्या पाठिब्यामुळे डोळ्यात अश्रू आल्याचे वाघेरे म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी दि.3 मे रोजी सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक झाली. मराठा समाजाच्या आंदोलनाकडे खा.श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचा सर्वानी बोलून दाखविले. त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजोग वाघेरेंना एकदा संधी देण्याचे एकमताने ठराव करण्यात आला.
तर शनिवार दि.4 मे रोजी पुन्हा बैठक बोलविण्यात या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वय डॉ.सुनिल पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडु, उमेश म्हसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, ह.भ.प.मारूती पाटील, धनश्री दिवाने, किरण हाडप, उत्तम भोईर, जे.पी.पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.