नील हॉस्पिटल येथे आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा ..
नील हॉस्पिटल येथे आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा 


 पनवेल / वार्ताहर   - : आंतरराष्ट्रीय मातृदिना निमित्त प्रसिद्ध स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ शुभदा नील यांनी मातृदिनाच्या शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
       आई हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचं पान आहे. आपण जे काही साध्य केले त्याचे श्रेय आईलाच जाते. आपल्या आयुष्यात तिचं स्थान, तिचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ती आहे म्हणून आपण या जगात आहोत. आपल्याला जग दाखवणारी माऊलीचे आपण कधी आभार मानत नाही. तिने आपल्यासाठी कधीही मोजता न येणाऱ्या असंख्य गोष्टी केल्या पण आपण कधीच तिच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपल्या जीवनातील आईचं महत्त्व समजून घेण्याासाठी आणि सुंदर आयुष्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. 
आई मायेची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पदर आहे. याच अनुषंगाने नवीन पनवेल येथिल निल हॉस्पिटल येथे आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा करण्यात आला.
Comments