कमलगौरी हिरु पाटील शिक्षणसंस्था(के.जी.पी) तळोजा संस्थेच्या विविध शाळांचा १०वी चा निकाल १००%
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः आज पनवेल तालुक्याचा 10 वी चा निकाल जाहीर होवून तो 97.76 टक्के लागला आहे. यात कमलगौरी हिरु पाटील शिक्षणसंस्था ( के.जी. पी) तळोजा संस्थेच्या विविध शाळांचा 10वी चा निकाल 100% लागला आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने दी ई- लाईट पब्लिक स्कुलचा 100% निकाल लागला असून कै.कमळू पाटील माध्यमिक विद्यालय या ही शाळेचा निकाल 100% लागला आहे. तसेच ए बी पाटील माध्यमिक विद्यालय निकाल 100% लागला आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.