पनवेल एज्युकेशन सोसायटीचा यंदा सुद्धा १० वी १२ वी चा निकाल १००%
पनवेल एज्युकेशन सोसायटीचा यंदा सुद्धा १० वी १२ वी चा निकाल १००%

पनवेल वैभव / दि.31 (संजय कदम) ः शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या पनवेल एज्युकेशन सोसायटीचा यंदाचा 10 वी व 12 वी चा निकाल सुद्धा 100% लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यशस्वी विद्यार्थ्यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसेन काझी यांनी अभिनंदन केले आहे.
यंदाच्या वर्षी पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या पी.ई.एस. इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज पनवेलचा 12 वी चा निकाल 100% लागला आहे. सायन्स विभागाचा रिझल्ट 100% लागून आयेशा नौशाद शेख हिला 87.33% मिळाले आहे. तर कॉमर्सचा रिझल्ट 96% लागून अर्शिया उस्मान खान 88.00% तर आर्टस् विभागाचा निकाल 93.75% लागून फलक जमील अन्सारी 72.83% ने उत्तीर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे याकुब बेग हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज पनवेलचा 10 वी चा निकाल 98.70% लागला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाने मुशरत याकुब खान 89.60%, सानिया अन्वर शेख 88.00%, सलमान अख्तार अली चौधरी 87.20%, बरिरा कौसार मोहम्मद फारुकी 87.20% उत्तीर्ण झाले आहेत. तसेच नॅशनल उर्दु हायस्कूल तळोजा 10 वी चा निकाल 100% लागला असून त्यामध्ये प्रथम जुहेर इब्राहीम पटेल 95.20%, जुवेरिया मुझफ्फर खामकर 94.20%, खदिजा जियाउद्दीन पटेल 91.60% गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत. अ‍ॅग्लो उर्दु हायस्कूल बारापाडाचा 10 वी चा निकाल 100% लागला असून त्यामध्ये अमिना रियाज दळवी 89.40%, सिदरा मुअज्जम दळवी 81.00% व मिशकत मुझफ्फर पालोबा 73.80% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

कोट
विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाले असून संस्थेमार्फत निकाल 100% दरवर्षी राखण्यासाठी शिक्षक वर्ग विशेष मेहनत घेत असतो व यामुळे निकाल सुद्धा समाधानकारक लागत आहे.
अध्यक्ष, इक्बाल काझी


फोटो ः इक्बाल काझी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image