एकट्या पनवेल शहरातच ४८ इमारती धोकादायक ...
पनवेल दि.०४(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतीची संख्या ही ८० च्या घरात पोचली आहे. पालिका प्रशासनाने या धोकादायक इमारतींना नोटीस बजावून इमारती मोकळ्या करण्याच्या सूचना देखिल दिल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
या संदर्भात धोकादायक इमारतीच्या नावाची यादी पनवेल महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. या धोकादायक इमारतीच्या संख्यामध्ये सर्वाधीक जास्त धोकादायक इमारती या प्रभाग ड पनवेल शहरातील आहे. एकट्या पनवेल शहरातच ४८ इमारती या धोकादायक आहे. यामध्ये वाल्मीका नगरमधील पनवेल महानगर पालिकेच्या स्टाफ कॉटर्सच समावेश आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीमधील एका इमारतीचा सहभाग आहे. ही दोन्ही ठिकाणे वर्दळीची असून रहिवाशी यांचा चोवीस तास वावर असल्याचे दिसून येते. पनवेल महानगर पालिका हद्दीत ज्यांना ६० वर्षांहून अधिक काळ गेला आहे. त्यामुळे या शहरातील धोकादायक इमारतीची संख्यादेखिल सर्वाधिक अशी आहे. यामध्ये पनवेल महानगर पालिका स्टाफ कॉटर्स तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे पॅडी मार्केट अशा वर्दळीची इमारतीचा समावेश आहे. त्या सोबत खारघर शहरातील १३ इमारती, कळंबोली शहरातील १० इमारती, कामोठे प्रभागातील ९ इमारती या धोकादायक असून या इमारतींना नोटीस बजावल्याची माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने खारघर मध्ये १३, कळंबोलीमध्ये १०, कामोठे मध्ये ९ आणि पनवेल मध्ये ४८ इमारती आहेत.
फोटो: धोकादायक इमारती (संग्रहित)