महामार्गावर लूटमार करणाऱ्या चौकडीतील दोघे पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात ...
   दोघे पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात ... 
पनवेल दि.१४(संजय कदम):पनवेल तालुक्यातील महामार्गावर लुटमार  करणाऱ्या सराईत चौकडी पैकी दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या कडून एक लुटमारीचा गुन्हा उघडकीस आला आहे.पनवेल जवळिल मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पळस्पे हायवे वाहतूक चौकी जवळ डंपर चालक जीतलाल महतो हा लघूशंके साठी थांबला असताना चार अनोळखी व्यक्ती नी त्याला मारहाण करून जबरीने त्यांच्या जवळील मोबाईल फोन, रोख रक्कम व हेडफोन असा१५,९००/- किमतीचा ऐवज चोरून नेला होता, याबाबत ची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे,महेश धुमाळ, सुनिल कुदळे व पोलीस शिपाई आकाश भगत आदिच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमी द्वारे आरोपी चा शोध घेत असताना या गुन्हातील आरोपी राहूल उर्फ भाऊ मधुकर धारपवार(२४),रा.खालपूर,व अविनाश धारपवार(२१),रा.खालापूर याची माहिती मिळाली त्या नुसार सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे तसेच इतर दोन फरार आरोपी चा शोध सुरू आहे. 


फोटो:आरोपी सह पोलीस पथक
Comments