अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई कधी करणार ; नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत
अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई कधी ?.. नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत 
नवी मुंबई (पनवेल वैभववृत्त सेवा ): अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापासून नवी मुंबई पालिकेकडे करत आहे.  याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे प्रशासनाने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.  नवी मुंबई प्रशासन नागरिकांचे बळी घेणार का असा सवाल- नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे 
    यामुळे अनधिकृत होर्डिंग्जला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी केली.मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेच्या बळी गेलेल्या नागरिकांच्या पार्श्वभूमीवर भगत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती

गतवर्षी मुंबई-बंगळुरू महामार्गावर पुणे येथे  होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. कालच मुंबई मध्ये देखील होर्डिग्ज कोसळून निरपराध नागरिकाचे बळी गेले, नवी मुंबई मध्ये देखील अनेक बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर लागले आहेत त्यांची चौकशी व्हावी, त्यांची तपासणी करून,धोकादायक होर्डिग्ज वर तातडीने कारवाई करावी अशी मागणी भगत यांनी केली आहे. 

-आंदोलनाचा इशारा-

तक्रारी करूनही होर्डिंग्जविरोधात वर्षभरात ठोस कारवाई केली नाही. आता तत्काळ कारवाई सुरू केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नामदेव भगत यांनी दिला.

-प्रत्यक्षात कारवाई नाही-

या घटनेपासून नवी मुंबई पालिकेकडे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी पत्रव्यवहार करत आहे. तत्कालीन आयुक्तांनी पत्रावर कारवाईचा शेराही मारला होता. वर्षभरात प्रशासनाने प्रत्यक्षात काहीही कारवाई केलेली नाही, नवी मुंबई परिसरामध्ये अनेक अनधिकृत होर्डिंग आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
Comments