संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा...
पनवेल दि २२ (वार्ताहर) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांनी राज्य पातळीवर महाविकास आघाडीशी युती केलेली आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील असलेल्या मावळ व रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजून पर्यंत स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षांची संपर्क साधलेला नाही त्यामुळे सर्व कार्यकर्ते संभ्रमात होते. त्यानुसार आज स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. व त्यासंदर्भातील पाठिंब्याचे पत्र जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समनव्यक दीपक घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना पाठिंब्याचे पत्र देताना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे व इतर