महाविकास आघाडी चे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारास पनवेल हनुमान मंदिर येथून धडाक्यात सुरवात
पनवेल / प्रतिनिधी : - ३३ मावळ लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ आज दि .८ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर लाईन आळी येथे वाढवून धडाक्यात सुरुवात करण्यात आली.
सदर पायी प्रचार रॅलीचा मार्ग लाईन आळी हनुमान मंदिर ,जय भारत नाका, मिरची गल्ली,पंचरत्न हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पायी प्रचार तसेच परिचय पत्रक दुकानदार व नागरिकांना देऊन व मशाल चिन्हा समोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या संजोग भिकू वाघेरे यांना निवडून आणण्याचे आवाहन आज सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीचे शिरीष बुटाला, प्रितम म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, भास्कर चव्हाण,प्रवीण जाधव,अच्युत मनोरे, अरुण ठाकूर, यशवंत भगत,राकेश टेमघरे, कुणाल कुरघोडे,सुजन मुसलोंडकर, सचिन रणदिवे, सनी टेमघरे,बापू जोशी,मयूर दसवते,अमर पटवर्धन, प्रशांत नरसाळे, संतोष तळेकर, निखिल भगत तसेच महिला आघाडीच्या कल्पना पाटील,प्रमिला कुरघोडे,अनुराधा ठोकळ,अर्चना कुळकर्णी, निर्मला म्हात्रे, उज्वला गावडे आदी महिला व पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.