करंजाडेत रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांची सिडकोकडे मागणी..
माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांची सिडकोकडे मागणी..


पनवेल दि.२६ (वार्ताहर): करंजाडे वसाहतीतील सेक्टर 1 ते 6 या मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडको कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
            करंजाडे वसाहतीमध्ये नव्याने रस्त्यांची डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या मनमानीपणाला लगाम बसत नसून वाहने अतिशय वेगाने जातात. परिणामी या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे डांबरीकरण करण्याचे काम सुरु असतानाच सेक्टर 1 ते 6 येथील रस्त्यावर मुख्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी येथील करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे, याची दखल सिडको प्रशासनाने घेऊन त्वरित या मार्गावर गतिरोधक बसवावेत, तरच पुढील अनर्थ टळेल. बोलताना रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.
Comments