आगामी सर्व सण व उत्सव सर्वांनी एकोप्याने व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे ; वपोनि अनिल पाटील..
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे ; वपोनि अनिल पाटील    

पनवेल दि ०८ (संजय कदम ) :  आगामी सर्व सण व उत्सव सर्वांनी एकोप्याने व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून साजरे करावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे  वपोनि अनिल पाटील यांनी पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील यांची मासिक बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल, येथे केले.   
     
या बैठकीत आगामी येणारे सण म्हणजेच  गुढीपाडवा, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , रमजान ईद, तसेच लोकसभा निवडणूक अनुषंगाने योग्य त्या सूचना वपोनि अनिल पाटील यांनी केल्या त्याचप्रमाणे  अवैद्य  धंदे, ( गावठी दारूची भट्टी, जुगार इ. ) भाडेकरू, संशयित इसम वाहने, माहिती देणे, महिला सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले, जनसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतसुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या तसेच सायबर क्राईम, ऑनलाइन फसवणूक इ. बाबत योग्य ते सूचना मार्गदर्शन केले  या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, गोपनीय विभागाचे अधिकारी कुवर यांच्यासह  ३९ पोलिस पाटील उपस्थित होते.



फोटो - पनवेल तालुका पोलीस ठाणे बैठक
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image