राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पनवेल कार्याध्यक्ष पदी प्रवीण शेंडे यांची निवड..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पनवेल कार्याध्यक्ष पदी प्रवीण शेंडे यांची निवड..

पनवेल दि.१२(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून  सुनील तटकरे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण राज्य भरात संघटना बांधणीचे कार्य मोठ्या जोमाने करत आहेत त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने तसेच प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या कार्यालयात नवीन पनवेल कार्याध्यक्ष पदी प्रवीण शेंडे यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
         हजारो युवकांना सहभागी करून संघटनात्मक बळ देऊ  व पक्ष संघटना वाढीसाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही मागे राहणार नाही असा विश्वास  नियुक्ती नंतर प्रवीण शेंडे यांनी प्रसार माध्यमा समोर  व्यक्त केला. यावेळी  प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, पनवेल शहर सोशल मीडिया प्रमुख सचिन कुंभार, उद्योजक  उमेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.



फोटो: प्रवीण शेंडे नियुक्ती
Comments