ऑनलाइन स्कील गेम च्या नावाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांची कारवाई...
जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांची कारवाई...

पनवेल दि. १७ ( संजय कदम  ) : पनवेल शहरात सुरु असलेल्या ऑनलाइन स्कील गेम च्या नावाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे . 
                     पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वडघर खाडी पूल येथे असणाऱ्या ऑनलाइन स्किल गेम या नावाखाली आकडे लावून जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्याने बनावट ग्राहक व दोन पंच यांच्यासह सापळा रचून कारवाई केली असता सदर ठिकाणी ऑनलाइन स्किल गेम च्या नावाखाली आकडे लावून जुगार खेळत असल्याबाबत खात्री झाल्याने सदर स्किल गेम या दुकानाचे मालक व चालक यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात लॉटरी रेगुलेशन ॲक्ट7 (3) ,9(1)जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(1),(अ)5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्या ठिकाणाहून  1. 31,300 -  रु किमतीचे ऑनलाइन गेमिंग करता असणारे संगणक साहित्य व रोख रक्कम 13,900/- मिळून आल्याने ते साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई सपोनी प्रकाश पवार,पो हवा अमोल पाटील, पो हवा सुधीर पाटील, पोना मिथुन भोसले,पो कॉ  विशाल दुधे,पो कॉ अभिजीत गडकरी आदींच्या पथकांनी केली आहे .
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image