गेल्या १० वर्षात दिलेली सर्व आश्वासने निवडून आल्यावर पूर्ण करणार : संजोग वाघेरे पाटील
गेल्या १० वर्षात दिलेली सर्व आश्वासने निवडून आल्यावर पूर्ण करणार : संजोग वाघेरे पाटील

पनवेल वैभव वृत्तसेवा  :-
आत्ताच्या खासदारांनी गेल्या १० वर्षात दिलेली सर्व आश्वासने निवडून आल्यावर पूर्ण करणार असल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी कळंबोली येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आज दि .३० रोजी पार पडली यावेळी ते बोलत होते.

यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नैना असो, जे एन पी टी, पासपोर्ट कार्यालय, अनियमित पाणी पुरवठा, टॅक्स संदर्भातील विषय असो आशा अनेक समस्या गेल्या १० वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत त्या सर्व पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक गावागावात गेल्या नंतर असा अनुभव आला की तेथील नागरिक सांगत होते की गेल्या १० वर्षात खासदार आलेले आम्हाला आठवत नाहीत. त्यांच्या देखील निवडून आल्यावर सर्व समस्या सोडवणार असल्याचे व वेळोवेळी भेट देणार असल्याचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांनी सांगितले. निवडणूक चिन्ह नवीन असले तरी देखील काहीही फरक न पडता मशाल चिन्हाला नागरिक मतदान करून तीन ते चार लाख मतांनी मला विजयी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या प्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा संपर्क नेते बबनदादा पाटील, काँगेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी देखील आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांना पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या विधानसभा मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आणण्याचे जाहीर केले.

यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, प्रशांत पाटील, शेकाप चे प्रितम म्हात्रे, गणेश कडू, कल्पना पाटील, पराग मोहिते, नंदराज मुंगजी, दीपक निकम, भरत पाटील,रेवती सकपाळ,शशिकांत डोंगरे, अनिल नाईक आदी उपस्थित होते.
Comments