८ वर्षांपासून पनवेलकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे ही यशस्वी शिखरे आम्ही गाठू शकलो आहोत - मंगेश परुळेकर ओरायन मॉल मालक
 मंगेश परुळेकर ओरायन मॉल मालक ....

पनवेल वैभव / दि.२८(संजय कदम): गेल्या ८ वर्षांपासून पनवेलकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे ही यशस्वी शिखरे आम्ही गाठू शकलो आहोतअसे प्रतिपादन ओरायन मॉल चे मालक मंगेश परुळेकर यांनी मॉलच्या आठव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्यावेळी केले. 
           पनवेल शहरासह रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये मध्ये अद्ययावत तसेच सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तूंचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओरायन मॉलने ९ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. त्यानिमित्तानं मॉलच्या वतीने ओरियन मॉल कार्निवल आयोजित केले आहे. या कार्निवल मध्ये शॉप अँड वीण सारखी लकी ड्रॉ तसेच मॉल मध्ये सायकलिंग सह लहान मुलांसाठी जगलर, कार्टून पोशाखातील मेस्कॉट आणि बँड बॉईज असे विशेष आकर्षणाचे कार्यक्रम तर आहेतच, सोबत वर्धापन दिनाचा केक मॉल चे ग्राहक, विक्रेते आणि सर्व कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत केक कापून ओरायन मॉलने आपला वर्धापन दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. 19 एप्रिल ते 19 मे दरम्यान हा कार्निवल चालणार आहे. या निमित्त 3 हजारांपर्यंत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळविण्याची संधी देखील या कार्निवलच्या रूपाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेअँम्प (Lekeamp) तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी पनवेलकरांनी या कार्निवल मध्ये सहभागी होऊन मॉल ला भेट देण्याचे अवाहन ओरियन मॉल चे मालक मंगेश परुळेकर ,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले होते. दरम्यान वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी मालक मंगेश परुळेकर यांच्यासह दिलीप करेलिया, मनन परुळेकर, ऐश्वर्या परुळेकर, मनांकी परुळेकर, करण शेट्टी आदी उपस्थित होते.


फोटो: ओरायन मॉल ८ वा वर्धापन दिवस
Comments