पनवेल शहर पोलिसांची ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठी कारवाई...
ऑल आउट ऑपरेशन राबवून केली मोठी कारवाई.. 
पनवेल वैभव दि.२३(संजय कदम):   पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. 
त्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील 24 आरोपी तपासले असता त्यापैकी 19 आरोपी मिळाले, तसेच हिस्ट्रीसिटर तपासले असता 4 मिळून आले, ५ जणांना अजामीपत्र .वॉरंट बजावण्यात आले. जामीनपात्र वॉरंट 13 जणांना बजावले , 33 
समन्स बजावले, कोप्टा अंतर्गत 51 कारवाई करण्य आली तसेच पनवेल परिसरात राबवण्या आलेल्या, तीन ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान 175 वाहने तपासनाय्त आली त्यापैकी.85 मोटर वाहनावर कारवाई करण्यात आली. तसेच 2 वाहनावर 185 प्रमाणे ड्रिंक अँड ड्राईव्ह गुन्हा दाखल करण्यात आला. अंमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी 2 ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली तर सेवन केल्या प्रकरणी 6 जणांवर कारवाई करण्यात आली तसेच दारूबंदी अंतर्गत 3 जणांवर कारवाई त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकावर कारवाई करण्यात अली आहे . सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते. 


फोटो:  ऑल आउट ऑपरेशन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image