कै.कृष्णराव मोरेश्वर गडमुळे यांच्या पुण्य स्मरणार्थ मान्यवरांचा सत्कार सोहळा...
कै.कृष्णराव मोरेश्वर गडमुळे यांच्या पुण्य स्मरणार्थ मान्यवरांचा सत्कार सोहळा... 

पनवेल : - कै. कृष्णराव मोरेश्वर गडमुळे यांच्या पुण्य स्मरणार्थ डिवाइन संस्कार रिसर्च फाऊंडेशन द्वारा रोहा येथील मातोश्री मंगल कार्यालयात मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार ब्रह्मा कुमारिज पनवेल सेवा केंद्राच्या संचालीका बी के तारा दिदी यांच्या हस्ते करण्यात आला.
समीरजी शेडगे माजी नगराध्यक्ष, महेंद्रजी गुजर गटनेता व माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्री राजू जी जैन, श्री महेशजी कोल्हटकर, सौ श्रद्धाजी पाटणकर, श्रीमती सुजाताजी चाळके, श्री मयूरजी दिवेकर, मेहंदळे हायस्कूलचे माजी प्रिन्सिपल मेहंदळे सर, मळेकर सर, सीडी देशमुख कॉलेज रोहा माजी प्राचार्य साळुंखे सर, जाधव सर, बेंद्रे मॅडम, प्रधान मॅडम, शहा मॅडम, भादेकर सर, दंत चिकित्सक डॉ प्रथमेश सुजाता रविंद्र बुधे, डॉ. श्रीनिवास वेदक, पत्रकार श्री करंबे काका, पत्रकार श्री दिलीप वडके काका, पत्रकार श्री विजय देसाई काका, श्री पांडुरंग सरफळे काका, श्री गुडेकर काका, एडवोकेट श्री प्रशांत देशमुख साहेब, पशुपक्ष्यांची तसेच निराधार वृद्धांची देखभाल करणारे श्री कुमार देशपांडे, स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा आंब्रे, गरीब गरजू पेशंट ना ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणारे श्री. रोशन विष्णू चाफेकर, कोरोना योद्धे इमरान डबीर इलियास डबीर मजहर सिद्दिकी, वृद्ध निराधारांना त्यांच्या आजारपणात आधार देणारे बिलाल मोर्बेकर, हजारो रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांद्वारे नवी दृष्टी देणारे नितीन परब, सौ. प्रितम निशिकांत पाटील अध्यक्षा रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुखद राणे महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्तानच्या इतिहासाचा मागोवा घेणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लेखक दुर्गअभ्यासक रायगड भूषण, स्वाती विठ्ठल शेळके एकदंत महिला बचत गट अध्यक्ष, सौ. दर्शना दीपक आठवले ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था रोहा या संस्थेच्या संस्थापक, तिवारी भाभी सर्वहारा आंदोलन संघटनेच्या खजिनदार, डॉ फरीद अब्दुल रहमान चिमाओकर कोविड योद्ध्यासाठी 17 वेळा सन्मानित रायगड भूषण, डॉ. कोलते मॅडम, पोस्ट ऑफिस मॅडम, ज्योती तेंडुलकर, शारदा मावशी गीता मावशी आज्ञा सिस्टर कोविड काळात भाईंची व पुर्ण गडमुळे कुटुंबाची सेवा करणारा नील हॉस्पिटल स्टाफ व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रो इ वी गिरीश यांनी टेंशन फ्री खुशनुमा जीवन जीने की कला या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. व मेडिटेशन करवून घेतले.
बीके तारा दिदी यांनी आशीर्वचन दिले. अस्मी पाटील, शमिका कुलकर्णी, महेक कदम या कन्यांनी स्वागत गीत, कॅन्सर गीत, शुभारंभ गीत, मेडिटेशन गीत शिव पिता का सत्य ज्ञान, सत्कार गीत या विविध गीतांवर मनमोहक नृत्यांद्‌वारे प्रेक्षकांना मोहित केले. विद्या घोडिंदे यांनी सुरेख सुत्र संचालन केले. 500 हून अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला
Comments