कळंबोली शिवसेनेत जोरदार इन्कमिंग शेकडो महिलांचा जाहीर पक्षप्रवेश...
कळंबोली शिवसेनेत जोरदार इन्कमिंग शेकडो महिलांचा जाहीर पक्षप्रवेश...

पनवेल ता.16(प्रतिनिधी) पनवेल  परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. मंगळवार ता.16 रोजी कळंबोली शहरातील शेकडो महिलांनी हातात भगवा झेंडा घेऊन सेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि महिला कळंबोली शहर प्रमुख सौ. ज्योतीताई पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा झंजावत सुरू केला आहे. सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. राज्यातील सर्व जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुरक्षा कवच दिले आहे. ही मर्यादा पाच लाखांपर्यंत केली आहे. त्याचबरोबर सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देऊन या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण त्यांच्या सुरक्षिततेसाठी एन डी ए सरकार प्रभावी काम करत आहे. परिणामी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनावर महिला वर्ग खुश आहे. संपूर्ण राज्यात शिवसेनेमध्ये विशेषतः महिला वर्गाचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. 
कळंबोलीत सुद्धा अनेक भगिनींनी सेनेत काम करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पक्ष पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला व या महिलांना पद नियुक्ती करण्यात आली.रीना राजेंद्र पाटील यांना शिवसेना जिल्हा संघटिका आणि.चंचला बनकर यांना खारघर शहर संघटिका असे पद नियुक्त करण्यात आलेले आहे. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी सर्वांचे स्वागत करून आगामी काळात सर्व महिला कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान दिला जाईल. त्याचबरोबर त्यांना पक्षाकडून उचित जबाबदारी दिली जाणार असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरुवात असलेली घोडदौड त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरणे ही शेवाळे यांनी विशद केले. या वेळी महिला कळंबोली शहर प्रमुख ज्योतीताई पाटील, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, कुंदाताई गोळे यांच्यासह  शेकडो शिवसैनिक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image