रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल रो.मंजू फडके यांनी रोटरीच्या कार्याचा घेतला आढावा..
पनवेल / प्रतिनिधी : - पनवेल मध्ये सामाजिक , पर्यावरण, वैदयकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कायमच समजोपयोगी कामात अग्रेसर असणारी संस्था म्हणजे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि याच रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चा प्रांतपाल भेटीचा (D G VISIT) चा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल रोजी पनवेल येथील सुरुची सभागृहात दणक्यात आणि मोठ्या दिमाखात पार पडला.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल रो. मंजू विश्वास फडके यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने रोटरी वर्ष २०२३ - २४ यावर्षी केलेल्या समाजसेवी कार्याचा आढावा घेतला. रोटरी क्लब पनवेल सेंट्रल चा महत्वाकांशी प्रकल्प घनदाट जंगल व रोटरी गार्डनला भेट देऊन विशेष कौतुक केले.
पोलिओ निर्मूलन कार्यासाठी रोटरी फॉउंडेशनला मदत करणाऱ्या रोटरी सदस्यांचा सत्कार केला. तसेच सदर क्लबने केलेल्या इतर सामाजिक कार्याचे, आदरातिथ्याचे खूपच कौतुक केले.
रांगोळ्यांनी सजवलेला परिसर, मुलींनी केलेले लेझीम च्या तालावर पाहुण्यांचे स्वागत, मराठमोळं वातावरण, फेटे बांधलेल्या महिला आणि पुरुष तसेच नारी शक्ती वर विशेष भर दिलेला दिमाखदार कार्यक्रमात पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले असे थोडक्यात वर्णन सदर कार्यक्रमाचे करण्यात येईल.
या कार्यक्रमात पनवेल मधील जेष्ठ समाजसेवक पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांचा प्रांतपाल रो. मंजू फडके यांच्या शुभहस्ते "व्यवसाय सेवा पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
PDG डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि PP डॉ. अमोद दिवेकर यांच्या देखरेखीखाली, District चे फर्स्ट जेंटलमन रो. विश्वास फडके, सहाय्य्क प्रांतपाल रो. कमलेश अग्रवाल, बहुसंख्य रोटेरियन्स, ऍनस, अनेट्स आणि इतर क्लबमधील निमंत्रित यांच्या उपस्थितीत कायम लक्षात राहील असा कार्यक्रम उत्साहात पार पडला.