गुन्हेशाखा कक्ष-०२ पनवेल कडुन अटक ; सहा गुन्हे उघडकीस
पनवेल दि.०१(संजय कदम): पोलीस आयुक्तालय हद्दी मध्ये गेल्या काही दिवसांपासून पनवेल व नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस बँकेमध्ये एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी जाणारे जेष्ठ नागरिक यांना सावज करून त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड व पिन घेवुन हातचलाखीने त्यांना दुसरेच एटीएम कार्ड देवुन त्यांचे बँक खात्यांतुन पैसे काढुन जेष्ठनागरिकांची फसवणुक केल्याचे गुन्हे घडत असल्याने अश्या अंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हेशाखा, कक्ष-०२, पनवेल ने ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हेशाखा) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अजयकुमार लांडगे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. कामोठे पोलीस ठाण्याचे हद्दी मध्ये एचडीएफसी बँक, कामोठे या बँकेतील एटीएम मशीन मधुन पैसे काढण्यासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाला एका अनोळखी इसमाने मदत करतो या बहाण्याने त्यांचे जवळ जावुन त्यांचे कडील एटीएम कार्ड व पिन नंबर घेवुन हातचलाखीने त्यांना दुसरा एटीएम कार्ड देवुन त्यांचे कडुन घेतलेल्या एटीएम कार्डने दुसऱ्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीन वरून १ लाख रुपये काढुन त्यांची फसवणुक केल्याने कामोठे पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानुसार सदरच्या गुन्ह्याचा शोध गुन्हेशाखा, कक्ष-०२ पनवेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोउनि सुनिल गिरी, पोउनि दिलीप भंडे, पोउनि मानसिंग पाटील, पोहवा मधुकर गडगे, अनिल पाटील, रमेश शिंदे, निलेश पाटील, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, तुकाराम सुर्यवंशी, दिपक डोंगरे, अजित पाटील, सागर रसाळ, राहुल पवार, पोना अजिनाथ फुंदे, विकांत माळी हे करत असताना तांत्रिक तपास करून आरोपी बाबत गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहिती वरून इसम नामे सय्याद कमललुदिन खान ( वय ३४ वर्षे), मोहम्मद शाबान ईलियास खान (वय ४४) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अतिशय कौशल्याने तपास केला असता त्यांनी कामोठे पोलीस ठाणे, खारघर पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाणे, कापुरबावडी पोलीस ठाणे, वासिंद पोलीस ठाणे, व कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याची तसेच त्यांचे विरूध्द यापुर्वी शहापुर पोलीस ठाणे, ठाणे ग्रामिण व कोनगांव पोलीस ठाणे, ठाणे शहर या पोलीस ठाण्यांचे हद्यीमध्ये गुन्हे केले असुन त्यामध्ये त्यांना अटक झाली असल्याची माहिती दिली व सदर गुन्हयात त्याचे वाटणीला आलेली रोख रक्कम ८०,०००/- रूपये व गुन्हयात वापरलेली वेरना कार कमांक HR-26/CF-1081 ही काढुन दिल्याने ती पंचनाम्यान्वये जप्त केली आहे. या गुन्ह्यामध्ये सय्याद कमललुदिन खान (वय ३४ वर्षे) आणि मोहम्मद शाबान ईलियास खान (वय ४४ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे.
फोटो: अंतरराज्य गुन्हेगार