कळंबोली पोलिसांची कोबिंग व ऑल आउट ऑप्रेशन अंतर्गत मोठया प्रमाणात कारवाई ; सोन्याच्या दागिन्यांसह देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत..
सोन्याच्या दागिन्यांसह देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत 

पनवेल दि.२५ (संजय कदम) : परिमंडळ २ पनवेलचे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाणे हददीत कोबिंग ऑप्रशन व ऑल आउट ऑप्रेशन राबविण्यात आले असुन त्यामध्ये कळंबोली पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्टल व तलवार हस्तगत केले आहे. 
                  कळबोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह ७ अधिकारी व २३ अंमलदार तसेच वाहतूक शाखा कळंबोली यांचेकडील २ वाहतुक अमंलदार यांनी एकत्रितपणे कळंबोली परिसरातील हद्दीमध्ये कारवाई केली. त्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे आरोपीत नामे अरबाज शेख यांचे तब्यातुन रू ३०,०००/- रूपये किंमतीचे देशी बनावटीचे मॅगझीन असलेले स्टील धातुचे १ पिस्टल व ३०००/- रूपये किमतीच ३ पितळी जिवंत काडतुस असे हस्तगत करण्यात आले आहेत. तर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे आरोपी अश्वीन सुर्यवंशी यांचेकडुन १९ इंच लांबीची तलबार हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपी अरमानसिंग रंधवा याचेकडुन एकुण १,२६०००/- रू. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. यासह विविध गुन्ह्यातील आरोपी, हिस्ट्रीशिटर आणि तडीपार आदी आरोपींचे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.



फोटो : प्रतीकात्मक फोटो
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image