पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन दमदाटी करणाऱ्या तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी केली अटक..
तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी केली अटक


पनवेल वैभव / दि. २८ ( संजय कदम ) :  पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन हॉटेलमध्ये जावून दमदाटी करणाऱ्या तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक  केली  असून त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . 
                   आरोपी नामे सलमान तजमुददीन मुलाणी, वय ३१ वर्षे, धंदा चिकन शॉप, राहणार याने पोलीस उप निरीक्षकचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सिताज हॉटेल (गोल्ड डिग्गर ) कोळखे, पनवेल येथे जावून हॉटेल मॅनेजर यांना माझ्या मैत्रीणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करुन तिला कामावरुन का काढून टाकले, चल आत्ताचे आत्ता तिचा हिशोब कर तिला लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करुन टाकीन अशी धमकी देवून हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करुन पुण्यावरुन पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केलेबाबत माहिती दिली. त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जावून स्वतःला पोलीस उप निरीक्षक म्हणुन सांगणारे सलमान तजमुददीन मुलाणी याचेकडे कौशल्यपुर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल मॅनेजर यांची तकार घेवून आरोपी विरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवि १७०, ३२३, ५०४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त  मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार व पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) बागवान, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि अस्पतवार व डि.बी पथकाचे अमलदार यांनी केली आहे.फोटो - तोतया पोलीस इसम
Comments