पनवेल तालुका पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर व सणासुदीच्या निमित्ताने घेतली बैठक..
   सणासुदीच्या निमित्ताने घेतली बैठक...

पनवेल, दि.31 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच सणासुदीच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांची बैठक घेेवून आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोेनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, गोपनीय विभागाचे अधिकारी कुवर आदींनी त्यांच्या हद्दीतील विविध पदाधिकार्‍यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच सणासुदीच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांची बैठक घेेवून त्यांना आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले. तसेच आचारसंहितेचे पालन करून सण व उत्सव साजरे करावेत अशा सुचना सुद्धा दिल्या.




फोटो ः पनवेेल तालुका पोलीस ठाण्यात बैठक
Comments