व्हिस्टा प्रोसेस फुड्स च्या सीएसआर फंडातून ४ लाखाचा धनादेश इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरला सुपूर्द...
धनादेश इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरला सुपूर्द... 
पनवेल दि.२२ (संजय कदम): 'व्हीस्टा प्रोसेस फुड्स' तर्फे पनवेल येथील इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांचा उपचार अल्पदरात व्हावा या उद्देशाने ४ लाखाचा धनादेश डॉ. सलील पाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 
           यावेळी कंपनीचे सीईओ भूपिंदर सिंग, कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार चंद्रशेखर सोमण, इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरचे सलील पाटकर, रो. डॉ. गिरीश गुणे, रो डॉ. आमोद दिवेकर,  रो डॉ. अभय गुरसले, रो प्रेसिडेंट रतन  करोल, रो सेक्रेटरी अनिल खांडेकर, रो. प्रेसिडेंट इलेक्ट शैलेश पोटे, रो दीपल गडगे व व्हीस्टा प्रोसेस फूड्सचे वरिष्ठ अधिकारी प्रथमेश पाटील उपस्थित होते. 
यावेळी बोलताना कंपनीचे सीईओ भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, कंपनीच्या सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात मदत आवश्यक घटकांना वेळोवेळी केली जाते. आतापर्यंत पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालय, मायावाकी फॉरेस्ट उपक्रम, पनवेल तहसील कार्यालय, तळोजा पोलीस ठाणे परिसर व आत्ता  इंडियन कॅन्सर ट्रीटमेंटच्या सेंटरला मदत देत असून यापुढे सुद्धा कंपनीमार्फत मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तर कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी सांगिलते की, या रकमेचा फायदा २०० रुग्णांना होणार आहे. येणारा आजार आपण थोपवू शकत नाही पण सदर रुग्णाला जास्तीत जास्त मदत कशी केली जाईल याकडे आम्ही पाहतो त्यातूनच आतापर्यंत आपण उपजिल्हा रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात औषधाची मदत, मित्र मंडळाच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने सर्वात पहिले शव गृह तसेच इतर ठिकाणी सुद्धा मदतीचा हात दिला आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा प्रस्ताव आला व त्याला कंपनीकडून मान्यता घेऊन आज हा मदतीचा धनादेश देताना एक वेगळा आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगिलते. या रकमेचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना मिळो असेही त्यांनी सांगिलते. फोटो: इंडियन कॅन्सर ट्रीटमेंटच्या सेंटर धनादेश
Comments