भूम येथून खून करून पळालेल्या आरोपीस पनवेल शहर व भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून केली अटक..
संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक..


पनवेल वैभव /दि.१५ (संजय कदम):   खून करून पळालेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस ठाणे व भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे. 
             भूम पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सुरज लहू तोडकर (वय २०) याने त्याची पत्नी पुर्णीमा (वय १८ रा पुणे) हीचा गळा दाबून खुन करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकुन पुर्ण शरीर जाळले होते. परंतु मयत महिलेचे प्रेत हे आरोपीने त्याची अल्पवयीन प्रियसी हिचे आत्महत्या असल्याचे भासविण्याकरीता तिचे साईड नोट नमुद मृतदेहा जवळ टाकली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज तोडकर व इतर आरोपींविरुद्ध तिथे गुन्हा भूम पोलीस ठाण्यात दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोरकड हा पनवेल बस स्टॅन्ड, अमरधाम परिसरामध्ये त्याचे मोटर सायकलवरून येणार असल्याची माहिती भूम पोलीस ठाण्याचे सपोनि शशिकांत तवार, यांना मिळाली. त्यांनी पनवेल शहर [पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी अभयसिंह शिंदे यांना कळविली. सदरची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली असता त्यांनी पोलीस उपायुक्त परि-२. विवेक पानसरे, व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना दिली असता त्यांच्या मार्गदशनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेकडी पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत, पोलीस उप निरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा परेश म्हात्रे, पोशि प्रसाद घरत, पोशी साईनाथ मोकळ असे पथक तयार करण्यात आले. प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे खास पथक तसेच सहा पोलीस निरीक्षक तवार व पथक असे आरोपीना शोध घेणेकामी. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली असता सदर आरोपी हा चिपळे गांव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्याप्रमाणे चिपळे गाव येथे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दोन पथक तयार करून सदर आरोपीसाठी सापळा रचला असता काही वेळात एक इसम संशयित दुचाकीवर एका महिलेसह येताना दिसला. तात्काळ सापळा रचून बसलेल्या पथकाने सदर संशयीत मोटार सायकलचा पाठलाग करून सदर इसमास ताब्यात घेतले असता हा नमूद गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात त्याने त्याची पत्नी पूर्णिमा हीचा त्याने विवाहबाह्य दुसऱ्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधास तिचा विरोध असल्याने तिचा गळा दाबून तिची हत्या करून तिची ओळख न पाटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. सदरचा गुन्हा स्वतःचे अस्तित्व लपवून पनवेल येथे जे.सी.बी वर चालक म्हणून काम करून पनवेल परीसरात राहत होता. अशी माहिती त्याने दिली आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाही करीना सपोनि तवार, भूम पोलीस ठाणे पाचे ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई या पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपूरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, यांच्या सुचणे नुसार व पोलीस उपआयुक्त, विवेक पानसरे, सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत याचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 


फोटो: भूम येथील आरोपीसह पोलिसांचे पथक
Comments