दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये निदर्शने..
   अटकेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये निदर्शने ..

पनवेल दि.३०(वार्ताहर): मोदी हटाव देश बचाव या घोषणांनी आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये काँग्रेस आणि ऑल इंडिया ह्युमन राइट्स यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
          पनवेल शहरातील काँग्रेस भवन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने जाणीवपूर्वक अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले आहे, या घटनेचा  तीव्र निषेध करण्यात आला. 
यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, ऑल इंडिया वुमन्स राईटच्या विनिता बर्फे,शेतकरी कामगार पक्ष पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू तसेच युवा नेते हेमराज म्हात्रे, कामगार नेते वैभव पाटील तसेच सुरेश पाटील,माजी नगरसेविका नगरसेविका शशिकला सिंह, सुधीर मोरे,शशिकांत बांदोडकर अरुण आदम ढलाईत,ऑल इंडिया ह्युमन् राईटच्या आरती सोनवणे, सिप्रा लोंढे, जयश्री खटकाले, दिपाली लोंढे आदी उपस्थित होते.



फोटो : निदर्शने
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image