शिवसेनेच्या नवीन पनवेल शहरप्रमुखपदी अतुल मोकल यांची नियुक्ती
शिवसेनेच्या नवीन पनवेल शहरप्रमुखपदी अतुल मोकल यांची नियुक्ती 

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने,तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या आदेशानुसार अतुल मोकल यांची शिवसेनेच्या नवीन पनवेल शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. 
                  सदर नियुक्ती पत्र  शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी  अतुल मोकल यांनी   शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे तसेच शिवसेना महानगरप्रमुख पनवेल ऍड. प्रथमेश सोमण यांचे मनापासून आभार मानले  . तसेच या पदासाठी त्यांच्या  मागे ठामपणे उभे असणारे त्यांचे  मार्गदर्शक शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे (बिनधास्त) भाई यांचे त्यांनी आभार मानले आहेत . तसेच या जबाबदारीचे मी भान ठेवून शिवसेना पक्षाच्या संघटना वाढीसाठी सतत काम करत राहीन आणि हिंदुहृदयसम्राट व धर्मवीरांची हिंदुत्वाची शिकवण अशीच पुढे घेऊन जात राहीन. असे ही अतुल मोकल यांनी सांगितले . फोटो - अतुल मोकल यांची नियुक्ती
Comments