पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मा.उपशहर प्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा रुग्णवाहिकेसह शिवसेनेत पक्ष प्रवेश ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न..
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेलचे उबाठा गटाचे उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, शिव वाहतूक सेनेचे उबाठाचे शहराध्यक्ष नितीन कसाबे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विजय जाधव, युवा समाजसेवक व प्रसिध्द उद्योजक चेतन देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

शैलेश जगनाडे आणि नितीन कसाबे या पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटात असताना रुग्णांना सेवा मिळावी यासाठी एक रुग्णवाहिका घेऊन ती त्यांना पक्षाला द्यायची होती, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करावे एवढी कार्यकर्त्यांची इच्छाही त्यांच्याकडून पूर्ण केली गेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेसह शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करून वर्षा निवासस्थानी या रुग्णवाहिकेचे नारळ फोडून लोकार्पण करण्यात आले. तसेच निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 
 
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा.मनीषा कायंदे, उपनेते विजय नहाटा, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार, उपनेत्या सौ.कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर, पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे उपस्थित होते.
Comments