के.एल.ई कॉलेजमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा...
कळंबोली, दि.14 :- सर्व सामान्य जनतेने ग्राहकांचे हक्क जाणून घेणे आवश्यक आहेत. ग्राहक हा राजा आहे, आणि त्यांचे विशेष हक्कांचे कायदे आहेत. हे कायदे समजून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन के.एल.ई एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स ॲन्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय मांडूळकर यांनी केले.
आज के.एल.ई एज्युकेशन सोसायटीच्यावतीने जागातिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. को फाऊंडेशन इंटिग्रेटेड फॅकल्टी मुलांनी यावेळी जागतिक ग्राहक दिनाचे महत्व या विषयावर सादरीकरण केले. त्यात पलक चव्हाण, युवराज तायडे, सृती मोरे, अथर्व खोपडे, चिन्मयी शिर्के, जय पटेल, क्रिश राऊत, कृष्णा पटेल, क्रिश राजभोर, खुशी धुरीया, अथर्व पटील, धैर्य सोळंकी, सौरभ शर्मा यांनी सहभाग घेतला.
जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. प्रा.आश्लेशा मुळे, संचिता माधव, प्रा. लेखा वर्मा यांनी विशेष मेहनत घेतली.