महाराष्ट्र शाळेच्या प्रांगणात शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार...
शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार...


पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : रोजच्या अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान कुठेतरी उपलब्ध व्हावेे व त्यातून पैशाची लेन देन करत  व्यवहार करता यावा व तो समजावा दैनंदिन जीवनातील कामकाज कसे चालते एखाद्या वस्तूची  देवाणघेवाण पण त्यातून नफा तोटा कसा ओळखावा.या स्तृप्त उपक्रमाने कळंबोलीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तील विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार नुकताच राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी व शिक्षक वर्गांनी मोठा सहभाग नोंदवला.
                  या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी लहान लहान स्टॉल मैदानावर आखून लिंबू , मिरची ,कणीस, फळ,भाज्या ,खाऊ ,फळे, पालेभाज्या अशा प्रकारचे विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेवल्या होत्या व ग्राहकांना बोलावत हे विद्यार्थि आपल्या दुकानाकडे आकर्षित करत होते.या उपक्रमाचे पालक वर्गाकडून कौतुक करण्यात आले . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  त्यांना प्रोत्साहन करत अशा प्रकारचे विविध उपक्रम स्पर्धा आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांचा पार पडलेला आठवडे बाजार हा विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक  ज्ञानात बदल घडवणारा असल्याचेया शाळेतील शिक्षक नमिता म्हात्रे यांनी  सांगितले.



फोटो -  विद्यार्थ्यांनी भरवला  आठवडे बाजार
Comments